शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे रक्तदान शिबिर.

 एरंडोल : शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (Shastri Institute of Pharmacy) पळासदळ या महाविद्यालयात जागतिक रेड क्रॉस सोसायटी (World Red Cross Society) दिनानिमित्त ८ रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

World Red Cross Society


संस्थेच्या संस्थापक सचिव रूपा शास्त्री यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष विजय शास्त्री होते. नियमित रक्तदानकेल्याने रक्ताचा प्रवाह अधिक सुरळीत होतो असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी आपले मत मांडले. 


       सूत्रसंचालन प्रा. मंगेश पाटील यांनी केले डॉ. चौधरी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी डॉ. शंकर सोनवणे सुनिता वाघ, दीक्षा पाटील, उमाकांत शिंपी, अन्वर खान, प्रा. जावेद शेख, प्रा. राहुल बोरसे, प्रा. मंगेश पाटील, प्रा. दिग्विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

Previous Post Next Post