आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लागणारी सूत्रे, शिष्टाचार, स्वयंशिस्त, वेळेचे व्यवस्थापन :- डॉ. विजय शास्त्री
प्रत्येकाने आयुष्यात कायम शिकत राहावे:-उप प्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी.
एरंडोल :- आज दिनांक २७ एप्रिल रोजी शास्त्री फार्मसी महाविद्यालयात द्वितीय वर्ष डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांंनसाठी निरोप समारंभ आयोजित केला गेला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि प्राचार्य डॉ. विजय शास्त्री हे होते सोबत संस्थेच्या मा. सचिव सौ. रूपा शास्त्री होत्या. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाल्या नंतर उप प्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
त्यानंतर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यानी आपले मनोगत मांडून शुभेच्छा देत द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप दिला. द्वितीय वर्षाची विद्यार्थ्यानी निकिता साळी हिने महाविद्यालयातील तिच्या प्रवासाच्या अनुभवा बद्दल सांगताना, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बद्दल कृतार्थ भाव व्यक्त केला व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे आभार मानले. या वेळी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यानी त्यांच्या दोन वर्षाच्या प्रवासातील महत्त्वाचे क्षणचित्रांची चित्रफित दाखवली तेव्हा सर्व उपस्थित भावनिक झाले. आपले मनोगत व्यक्त करताना विभागप्रमुख प्रा. जावेद शेख यांनी उच्च शिक्षण घेण्याचा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांंना दिला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उप प्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी सांगितले की प्रत्येकाने आयुष्यात कायम शिकत राहावे, जेणे करून ती व्यक्ति नेहमीच अद्यावत राहते आणि भविष्यात येणार्या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम असते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वानुभवातून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लागणारी सूत्रे, शिष्टाचार, स्वयंशिस्त, वेळेचे व्यवस्थापन उदाहरणा सहित समजाऊन सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा पाटील व ममता पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. जावेद शेख, प्रा. हितेश कापडणे, प्रा. दिपाली बादशाहा, प्रा. रोशनी पाटील, प्रा. कीर्ती पाटील व प्रा. मयुरी पाटील यांनी मेहेनत घेतली. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती होते असे जनसंपर्क अधिकारी श्री. शेखर बुंदेले यांनी कळविले.