एरंडोल :-आज दि. 11 May 2024 रोजी शास्त्री इन्स्टिटय़ुट ऑफ फार्मसीत सहावा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. 11 मे 2018 रोजी डॉ. विजय शास्त्री व सौ. रूपा शास्त्री यांच्या स्वप्नातले शास्त्री इन्स्टिट्यूट प्रचंड मेहनती चा परिणाम स्वरुप पूर्णत्वास आले होते.
एका सामान्य शिक्षकाचे असामान्य प्रयत्नातून आणी इच्छा शक्तितून संस्थाचालक होण्याचा प्रवास खूप प्रेरणा दायक आहे. संस्थेचा सहावा वर्धापनदिन सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सोबत साजरा करताना संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ.विजय शास्त्री व सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्या चेहर्यावरचा आनंद काही वेगळाच होता.संस्थेच्या आजपर्यंतच्या प्रगतीचे श्रेय विद्यार्थ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा परिणाम आहे हे सांगत भविष्यातील वाटचाली बद्दल व नवीन ध्येय गाठणे बद्दल डॉ. शास्त्री यांनी मार्गदर्शन केले.
सहाव्या वर्धापन दिनी सहा नवीन वृक्षारोपण करून आपल्या निसर्गाच्या प्रति असलेल्या कर्तव्याचे पालन संस्थेने केले. निसर्गाने केलेल्या उपकारांची परतफेड आपण कधीच करू शकत नाही पण निदान काही अंशी संवर्धन तर नक्कीच करू शकतो त्यातलाच हा एक प्रयत्न असे मत सौ. रूपा शास्त्री यांनी मांडले.
संस्था प्रगती पथावर चालणं म्हणजे विद्यार्थी आणी त्यांच्या पालकांनी संस्थेवर आणी डॉ. शास्त्री यांच्या 25 पेक्षा जास्त वर्षाच्या कार्यावर दाखवलेला विश्वास कारणीभूत आहे असे प्रतिपादन उप प्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी केले. महाविद्यालय वृद्धीन्गत होण्यामागे डॉ. शास्त्री नी दाखवलेला आमच्या वरचा विश्वास आहे असे प्रा. जावेद शेख यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते असे जनसंपर्क अधिकारी श्री. शेखर बुंदेले यांनी कळवले.