चाळीसगाव तालुक्यातील प्रा.आ.केंद्र दहीवद तसेच अंतर्गत गावात जागतिक हिवताप दिवस साजरा....

      

तालुक्यातील प्रा.आ.केंद्र

 प्रतिनिधी सौ.करिष्मा ठाकरे 


    चाळीसगाव :- दहीवद दिनांक २५ एप्रिल २०२४ रोजी जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र दहीवद येथे आणि अंतर्गत गावात आरोग्य सेवक मार्फत विवीध कार्यक्रम द्वारे हिवताप जनजागृती करण्यात आली.
        

तालुक्यातील प्रा.आ.केंद्र

       जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख , डॉ.प्रशांत बोरसे तालुका आरोग्य अधिकारी यांचे सूचनेनुसार किरण कुमावत  तालुका हिवताप पर्यवेक्षक यांचे पर्यवेक्षण नुसार डॉ अक्षय देशमुख, डॉ.निकिता नगराळे यांचे मार्गदर्शनाने सुरेश देवकर, संदीप पाटील यांनी सुष्म नियोजन करून कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्य सेवक यांचे कडून प्रत्येक गावात घरोघरी, ठिक ठिकाणी नागरिकांत मोठ्या प्रमाणात हिवताप विषयावर चर्चा,माहिती,आरोग्य शिक्षण विषयी ची जनजागृती करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post