लोकसभेच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक संपन्न...

जळगाव प्रतिनिधी.

जळगाव -- येथील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत यांच्या कार्यालयात जळगाव व रावेर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक प्रदेश संघटक शाम जयवंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक संपन्न...




                  बैठकीच्या सुरवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून जिल्हाध्यक्ष तुषार सावंत यांनी संघटनात्मक कामकाजाचा आढावा मांडला व पुढील नियोजनाची माहिती दिली. संभाजी ब्रिगेडच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने लोकसभा निवडणुकीत काय केलं पाहिजे?यावर मत व्यक्त केले. बैठकीचे अध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक शाम पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सध्या देशभरात लोकसभेच्या निवडणुका संदर्भात वातावरण तापलेले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण, पायाभूत सुविधा इ.स्तरावर केंद्र सरकार बहुतांशी अपयशी ठरलेलं आहे. देशाची वाटचाल अनपेक्षितरित्या हुकूमशाहीकडे सुरू आहे. जो भाजपच्या बाजूने तो तेवढा चांगला आणि जो विरोधात बोलण्याचा प्रयत्न करेल त्यावर ईडी, सीबीआय आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर करत मुस्कटदाबी केली जातेय. देशाचा मूलाधार असलेलं संविधान आज धोक्यात आहे म्हणूनच संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. जर आज हे रोखता आलं नाही तर भविष्यात सार्वत्रिक निवडणुका होतील की नाही असा प्रश्न आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जो शेतकरी, कष्टकरी, वंचित उपेक्षित लोकांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची तयारी दाखवेल त्याच्यासोबत आज आणि भविष्यात देखील आम्ही राहू, असे शाम पाटील यांनी केले. 

                  मान्यवरांच्या उपस्थितीत धरणगाव तालुकाध्यक्षपदी वाकटुकी येथील रविंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी शोभराम प्रतिष्ठानचे नरेंद्र पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर चौधरी, महानगर अध्यक्ष संदीप पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष प्रफुल पाटील,एरोडलं तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, जिल्हासंघटक गणेश पाटील,संदीप मांडोळे, अविनाश पाटील,भरत पाटील, संदीप पाटील, प्रदीप पाटील, सुमेरसिंग पाटील, सुभाष पाटील, विलास पाटील, राहुल शिंदे, शंतनू जगताप,हर्षल वाणी, राकेश जगताप, राकेश कोठारी, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post