‘तुनी अदावर दीवाना’ हे अहिराणी गाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी होणार प्रदर्शित !.....
धरणगांव प्रतिनिधी - पी डी पाटील
धरणगांव - शहरातील मोठा माळीवाडा समाज मढी मध्ये समाधान पाटील यांचे माधुरी प्रोडक्शन चे वधु - वर व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पोस्टर रिलीज करण्यात आले. कार्यक्रमाला कांचन पाटिल (दिग्दर्शिका, मनसे चित्रपट सेना महिला जिल्हा अध्यक्ष जळगाव), मुकुंदा भाऊ रोठे (मनसे जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष), किरण तेलेले, (महा नगर अध्यक्ष) जळगाव, संजय छगन महाजन (भाजपा गटनेते), विजय धनलाल महाजन (नगरसेवक), पी डी पाटील ( आदर्श शिक्षक), व्ही टी माळी ( कोषाध्यक्ष ) गोपाल भास्कर महाजन ( सचिव ) उपस्थित होते.
शहरातील अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत असलेल्या एका युवकाने सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याची स्वतःची म्युझिक कंपनी ही सुरु केली यू ट्यूब चॅनेल काढून अहिराणी गाण्यांची मालिका सुरू केली आहे. स्वतःची ‘माधुरी फिल्म प्रोडक्शन म्यूजिक कंपनी’ त्याने सुरु केली आहे. हा युवक मनसे चित्रपट सेनेचा धरणगांव तालुका अध्यक्ष व महात्मा फुले हाइस्कूलचा माजी विद्यार्थी समाधान सुरेश माळी असून त्याने अहिराणी चित्रपट क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.
नुकतेच त्याने धरणगांव शहरात ‘तुनी अदावर दीवाना’ या अहिराणी गाण्याचे चित्रीकरण केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याच्या या चित्रीकरणाला उस्फूर्त असा प्रतिसाद देत जल्लोष केला. या गाण्याचे दिग्दर्शन स्वतः समाधान माळी व धरणगांव – जळगांव डेली सव्हीसजचे मालक सोनू चौधरी या दोघांनी या गाण्याचे निर्माण केले आहे.
गाण्याचे गायण सुप्रसिद्ध कलाकार प्रशांत देसले सर यांनी तर संगीत मयूर साळुंके यांनी दिले आहे. साउंड डिझाइन सुप्रसिद्ध राजस स्टूडियोचे डी. जे. गोलू धरनगांव यांनी केले आहे. गाण्यात मुख्य भूमिका ही खान्देशचे सुपरस्टार अजय कुमावत व स्नेहा बडगुजर यांनी साकारली आहे. यांच्या सह कलाकार समाधान माळी व बाल कलाकार तनु सोनू चौधरी असून गाण्याला कोरियोग्राफ संदीप डि पटोले यांनी केले आहे. गाण्याचे चित्रीकरण राजमुद्रा फोटो स्टूडियोचे आशुतोष पाटिल यांनी केले.
गाण्याच्या संपूर्ण चित्रीकरणास गावातील नागरिकांचे व मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले. ‘तुनी अदावर दीवाना’ हे अहिराणी गाणे लवकरच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माधुरी फिल्म प्रोडक्शन कंपनीच्या ‘माधुरी फिल्म प्रोडक्शन’ या यूट्यूब चैनल वर प्रसिद्ध होणार आहे. व तसेच १८एप्रिल २०२४ या रोजी बहिनी च्या लग्नात केली कंपनी ची ओपनिंग त्याची बहिन व पाहुने यानी केली तसेज पोस्टर रिलीज केले.
यावेळी अनेक मान्यवराने देखील फोन वर शुभेच्छा दिलेत व मार्गदर्शन केले. यामध्ये राजसाहेब ठाकरे (मनसे अध्यक्ष महा. राज्य ), अमये जी खोपकर साहेब (मनसे चित्रपट सेना अध्यक्ष महा राज्य),
रमेश परदेशी अभिनेते (पिट्याभाई)(मनसे चित्रपट सेना उपाध्यक्ष महा राज्य),
प्रवीण विठ्ठल तरडे (दिग्दर्शक धर्मवीर फेम), आनंद दादा कुंदुर(मनसे चित्रपट सेना पुणे शहर अध्यक्ष), योगेश दादा भोसले ( दिग्दर्शक 143 चित्रपट फेम ), मा. सुरेश राजपूत ( जुनियर आर्टिस्ट )(मनसे चित्रपट सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष) यांचा समावेश आहे.