शास्त्री फार्मसी महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन साजरा.

एरंडोल :- येथील शास्त्री महाविद्यालयात दिनांक 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिनानिमित्त मार्गदर्शनपर कार्यक्रम साजरा करण्यात आला. 

आज दिनांक 23 एप्रिल रोजी

पुस्तक वाचल्याने शब्द संग्रह वाढतो - डॉ.विजय शास्त्री.

                  कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि प्राचार्य डॉ. विजय शास्त्री हे होते.   दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर उप प्राचार्य डॉक्टर पराग कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली,आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि सांगितले की युनेस्को संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटने द्वारे प्रथम 23 एप्रिल 1995 रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईटला प्रोत्साहन देणे हे या कार्यक्रमा मागील कल्पना होती आणि तेव्हापासून जागतिक पुस्तक दिन हा एक जागतिक उत्सव बनलेला आहे असे त्यांनी सांगितले. 


            आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की त्यांनी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यासाठी एखादे चांगले पुस्तक निवडावे आणि ते मनापासून वाचावे. पुस्तक वाचण्याचे अनेक फायदे आहेत जसे आपला शब्दसंग्रह वाढतो, दैनंदिन जीवनातील ताण-तणाव कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या ज्ञानात वृद्धी होते. आपण स्वतः तर पुस्तक वाचलेच पाहिजेत आणि इतरांना सुद्धा वाचण्यास प्रोत्साहित करावे. त्यासाठी शक्य असल्यास प्रसंगी स्थानिक शाळा, ग्रंथालय किंवा धर्मादाय स्थळे यांना पुस्तके दान करावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास संस्थेच्या सचिव सौ. रूपा शास्त्री हे उपस्थित होते. 


            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. जावेद शेख, प्रा. राहुल बोरसे प्रा. मंगेश पाटील आणि समस्त प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले. जनसंपर्क अधिकारी श्री शेखर बुंदेले यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post