कल्पना मापूसकर यांचा "ज्येष्ठ साहित्यिका" पुरस्काराने सन्मान.

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्यिका कल्पना दिलीप मापूसकर यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना "ज्येष्ठ साहित्यिका प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  

कल्पना मापूसकर यांचा "ज्येष्ठ साहित्यिका" पुरस्काराने सन्मान.


२५ ऑगस्ट रोजी नॅशनल लायब्ररी बांद्रा येथील कार्यक्रमात अध्यक्ष बाळासाहेब तोरस्कर, लेखक कवि डॉ. खंडू माळवे, पदश्री जी. डी. यादव, भानुदास केसरे, प्रमोद महाडीक, डॉ. सुकृत खांडेकर, राजेश कांबळे, डॉ. नॅन्सी अल्बुकर्क, रामकृष्ण कोळवणकर, डॉ. रेडिक एंजल्स आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. नागेश हुलावळे, रमेश मारुती पाटील, प्रमोद सुर्यवंशी, योगेश हरणे तसेच आयोजन समितीचे सर्व सदस्य त्यावेळी उपस्थीत होते.


साहित्य सेवा करत असलेल्या मीरा रोड येथील ज्येष्ठ साहित्यिका म्हणून कल्पना मापूसकर यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. त्यांचे लेखन सामाजिक बांधिलकी जपणारे आहे. समाजातील विकृत घटनांवर ताशेरे ओढणारे असते. वृद्धाश्रम, हुंडा, स्त्रीभ्रूण हत्या, महागाई, डिप्रेशन, वारांगना, लोकशाही, बलात्कार, गरिबी, बालकामगार, बेरोजगार अशा विषयावर त्यांनी आपल्या लेख, कवितांमधून विषयाच्या गांभीर्याला वाचा फोडली आहे. त्यांचा "कल्पदीप" हा काव्यसंग्रह त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी लिहिलेला "रॉकेल" हा लघुपट नुकताच लय भारी प्रॉडक्शन मार्फत प्रदर्शित झाला आहे. त्यांना अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमधून सन्मानित करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post