किड्स स्पोर्ट्स कार्निवल २०२४ – एक अनोखी आंतर-शालेय स्पर्धा..

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. त्याच राष्ट्रीय सणाचे महत्व ओळखून प्रज्ञा वर्धिनी फाऊंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांनी संयुक्त विद्यमाने पुन्हा एकदा "किड्स स्पोर्ट्स कार्निव्हल २०२४" चे आयिजन केले आहे. 

किड्स स्पोर्ट्स कार्निवल २०२४ – एक अनोखी आंतर-शालेय स्पर्धा.


शनिवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत प्राथमिक विभागासाठी आणि दुपारी १२ ते ३ या वेळेत पूर्व-प्राथमिक विभागासाठी सुविद्या स्पोर्ट्स अकादमी, गोराई, बोरीवली पश्चिम येथे ह्या कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले असून, पारितोषिक वितरण समारंभ सुद्धा ह्याच दिवशी संपन्न होईल.


सदर क्रीडा महोत्सवामध्ये पश्चिम मुंबई उपनगरातील १५ शाळांमधून ९०० पालक आणि मुले सहभागी होत असून, या कार्यक्रमाला उत्तर मुंबई मतदारसंघाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि वीरमाता डॉ. अनुराधा ताई गोरे उपस्थित राहाणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post