पळासदळ ता. एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी कु. वैष्णवी प्रकाश पाटील हिची नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पहिल्याच परीक्षेमध्ये वैष्णवी ने हे यश संपादन केलेले असून संपूर्ण तालुक्यातून तिच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे.
नुकतीच तिची साटवली ता.लांजा,जि. रत्नागिरी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. सदरील यश संपादन केल्याबद्दल शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री, उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वैष्णवी चे अभिनंदन केले. आपले मनोगत व्यक्त करताना वैष्णवी ने महाविद्यालयात विविध स्पर्धात्मक परीक्षांवर मार्गदर्शन केले जाते त्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले. तसेच औषध निर्माण शास्त्राचा अभ्यास करत असताना ईतर स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास मेहनतीने व चिकाटीने करत तिने हे यश संपादन केलेले आहे.
कुठलीही अडचण येत असताना वेळोवेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून योग्य असे मार्गदर्शन मिळत असे असे तिने नमूद केले. सरकारी नोकरी मिळवणारी वैष्णवी ही जरी महाविद्यालयातून यावर्षीची पहिली विद्यार्थिनी असली तरी अजून महाविद्यालयातून असंख्य विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवतील असे प्रा. डॉ. विजय शास्त्री यांनी सांगितले असे कॉलेजचे जनसंपर्क अधिकारी शेखर आर बुंदेले यांनी कळविले.