क्रांतीसूर्य होते म्हणून आम्ही आहोत -- नाजुका भदाणे
धरणगाव प्रतिनिधी --
धरणगाव -- येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त तात्यासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला तात्यासाहेबांच्या प्रतिमेला प्राचार्या चैताली रावतोळे यांनी माल्यार्पण केले. शाखा व्यवस्थापक जगन गावित आणि मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. भारत देशातील स्त्री शिक्षणाचे जनक, देशाचा मूळ इतिहास मांडणारे, सत्यशोधक समाजाचे संस्थापक, तत्वनिष्ठ संशोधक, छत्रपती शिवरायांवर कुळवाडी भूषण नावाचा पोवाडा रचणारे व पुण्यात १० दिवसांची शिवजयंती काढणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले फक्त बोलके नव्हे तर कर्ते समाजसुधारक होते, असे प्रतिपादन उपशिक्षिका नाजुका भदाणे यांनी केले. कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, स्वाती भावे, ग्रीष्मा पाटील, गायत्री सोनवणे, पुष्पलता भदाणे, सुनिता भालेराव, सपना पाटील, लक्ष्मण पाटील हे शिक्षकवर्ग तसेच शितल सोनवणे, वैशाली पाटील, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार आदी शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता १० वी चे विद्यार्थी उपस्थित होते.