संगीतमय वातावरणात स्वर्गसुखाची अनुभूती मिळते -- सुधाकर वाणी
धरणगाव प्रतिनिधी --
धरणगाव -- येथील राधा किसन नगर व संगीत प्रेमी मित्र परिवाराच्या वतीने गृह निर्माण प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारका जवळ 'पाडवा पहाट' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी नववर्ष व गुढी पाडव्याचे औचित्य साधून पाडवा पहाट हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रभू राम, सीता माता व लक्ष्मण यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राधा किसन नगरचे संचालक सुधाकर वाणी यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करतांना सांगितले की, संगीतमय वातावरणात झालेली मंगलमय सुरवात स्वर्गसुखाची अनुभूती प्रदान करते. कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संगीतम ऑर्केस्ट्रा चे कलाकार सचिन भावसार, उज्वल पाटील, नाना पवार व त्यांचा मित्र परिवार तसेच गावातील स्थानिक कलाकारांनी भावगीते, भक्तिगीते, मराठी हिंदी चित्रपटातील गीतांचे उत्तम प्रकारे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रम प्रसंगी एलआयसी चे डेव्हलपमेंट ऑफिसर गणेश रावतोळे, गटनेते कैलास माळी सर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील, वाणी समाज अध्यक्ष विलासनाना येवले, नगरसेवक ललित येवले, अजयशेठ मालपुरे, भाजप मीडिया प्रमुख टोनी महाजन, डॉ.हेडगेवार ग्रामपंचायत येथील वैभव बोरसे, किरण वाणी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन राधा किसन नगरचे संचालक सुधाकरशेठ वाणी, प्रशांतशेठ केले, महेंद्रशेठ सैनी तसेच किरण महाजन, सुधर्मा पाटील, दिपक चौधरी, किरण चौधरी, विनोद चौधरी, पियुष बागड आदींनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राधा किसन नगर व संगीतप्रेमी मित्र परिवाराने परिश्रम घेतले.