बाबासाहेब भारत देशाचे भाग्यविधाते -- लक्ष्मणराव पाटील.
धरणगाव प्रतिनिधी -- पी डी पाटील
धरणगाव -- येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये प्रज्ञासूर्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेला प्राचार्या चैताली रावतोळे यांनी माल्यार्पण केले. शाखा व्यवस्थापक जगन गावित आणि मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. उपशिक्षिक लक्ष्मणराव पाटील यांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्याग व समर्पणाची माहिती दिली. देशाचे संविधान निर्माण करणारे बाबासाहेब खऱ्या अर्थाने भारत भाग्यविधाते आहेत, असे प्रतिपादन उपशिक्षिक लक्ष्मणराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, स्वाती भावे, ग्रीष्मा पाटील, गायत्री सोनवणे, पुष्पलता भदाणे, सुनिता भालेराव, सपना पाटील, लक्ष्मण पाटील हे शिक्षकवर्ग तसेच शितल सोनवणे, वैशाली पाटील, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार आदी शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.