सत्यशोधक समाज संघाच्या माध्यमातून यापुढे सर्व विधी सत्यशोधक पद्धतीने गावात करण्याचा प्रयत्न करूया - माजी सरपंच सारंगधर अहिरे.
प्रतिनिधी - पी.डी.पाटील
जामनेर - टाकळी खुर्द ता.जामनेर येथील रहिवासी राहुल वराडे यांचे आजोबा व सत्यशोधक समाजाचे प्रचारक रमेश दादा वराडे यांचे काका कै.रघुनाथ वराडे यांचे गंधमुक्ती व उत्तरकार्य विधीकर्ते सत्यशोधक शिवदास महाजन ( एरंडोल ) यांच्या हस्ते पार पडला.
सत्यशोधक समाजाची प्रार्थना घेऊन विधीला सुरुवात करण्यात आली. उपस्थितांना माजी सरपंच समाधान वराडे यांनी सत्यशोधक पद्धतीने विधी का करायचा ?.. प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. कै.रघुनाथ वराडे यांच्या स्मृर्तीप्रित्यर्थ वृक्ष लागवड करण्यात आले. नातलग मंडळींना सत्यशोधक समाजाची दिनदर्शिका -२०२४ वाटप करण्यात आली. आयोजकांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यास १००० रू. सहयोग निधी दिला.
काही पैसे शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासाठी दिले. कार्यक्रमास माजी सरपंच सारंगधर अहिरे, एम डी अहीरे, मुख्याध्यापक सुरेश तायडे, पंढरीभाऊ जगताप व मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांनी स्थापित केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म पद्धतीने केलेला विधीचे गावातील ग्रामस्थांच्या वतीने या क्रांतिकारी निर्णयाचे अभिनंदन व कौतुक होत आहे.