शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.


शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.


एरंडोल:-दि. १४ एप्रिल २०२४ रोजी शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमच्या सुरवातीला प्रा. जावेद शेख यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रा. जावेद शेख व प्रा. हितेश कापडणे यांनी  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा "सफलता प्राप्ती ची गुरुकिल्ली शिक्षणातून प्राप्त होते" हा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व मा. सचिव सौ. रूपा शास्त्री यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तथा जनसंपर्क अधिकारी शेखर आर बुंदेले उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post