जि. प. शाळा बोरगांव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

धरणगांव  -  तालूक्यातील बोरगांव बु॥ आणि बोरगांव खु॥ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दोन्ही शाळेंचे वार्षिक स्नेहसंमेलन  कलाविष्कार 2023-24 चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास उपस्थित पालक, ग्रामस्थ, नागरीकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

जि. प. शाळा बोरगांव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

जि. प. शाळा बोरगांव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


कार्यक्रमास धरणगाव येथील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर भगवान महाजन यांचेसह सरपंच  लक्ष्मण गोमटू, उपसरपंच महेश मराठे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश मराठे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राची लोकधारा.. राम सियाराम... कोळीगीत.. लल्लाटी भंडार गीत... फनी डान्ससह विविध कलागुण विद्यार्थ्यांनी सादर केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  नाना साळुंखे सरांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीसाठी  जि. प. शिक्षक तुकाराम पाटील, प्रमोद पाटील, स्वाती देसले, योगेश पाटील यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post