साहित्यिका,लावणीकारा सरोज गाजरे यांचा"जीवन गौरव"पुरस्काराने यथोचित गौरव.

साहित्यिका,लावणीकारा सरोज गाजरे यांचा"जीवन गौरव"पुरस्काराने यथोचित गौरव.


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वर्ल्ड व्हिजन संस्थेचे संस्थापक प्रा. नागेश हुलावडे, आम्ही मुंबईकर सा. वृत्तपत्राचे संपादक प्रमोद सुर्यवंशी, योगेश हरणे यांच्या सौजन्याने विख्यात साहित्यिका, लावणीकारा सरोज सुरेश गाजरे भाईंदर ठाणे मुळ गाव जळगाव खानदेश यांना त्यांच्या सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन "जीवन गौरव प्रजासत्ताक अमृत गौरव" हा पुरस्कार प्रदान करून गौरवान्वित करण्यात आले. 

         नॅशनल लायब्ररी सभागृह, स्वामी विवेकानंद रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई येथे २५ ऑगस्ट २०२४ रोजी साहित्यिक व पत्रकार बाळासाहेब तोरसकर यांच्या उपस्थितीत तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


सदर कार्यक्रमाला उद्घाटक डॉ. ख. र. माळवे - उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला संस्कृती महोत्सव समिती, स्वागताध्यक्ष प्रा. नागेश हुलावळे, पद्मश्री शास्रज्ञ डॉ. यादव, नासा शास्रज्ञ डॉ. डेरिक एंजल्स, ज्येष्ठ पत्रकार दैनिक प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post