धरणगाव प्रतिनिधी -- आज जळगाव येथील मराठा सेवा संघाच्या हॉलमध्ये जिजाऊ ब्रिगेडची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. यामध्ये शिवमती ज्योती लक्ष्मण पाटील यांची जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
सर्वप्रथम जिजाऊंच्या लेकींनी परिचय करून दिला. तद्नंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष शिवमती लिना राम पवार यांनी केले. जिजाऊ ब्रिगेडची संघटनात्मक भूमिका तसेच आजच्या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. बैठकीच्या प्रमुख मार्गदर्शक शिवमती सीमा बोके यांनी जिजाऊ ब्रिगेडची वैचारिक भूमिका विषद केली. तसेच सर्व संघटनात्मक कामकाजाचा आढावा देखील घेण्यात आला. महिलांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, बुरसटलेल्या रूढी परंपरा झुगारून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला पाहिजे. महिलांनी स्वावलंबी होऊन स्वतःचा आर्थिक विकास साधला पाहिजे जेणेकरून त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जिजाऊ, अहिल्यामाई, सावित्रीमाई, रमाईंचा विचार घराघरात पोहचायला मदत होईल, असे प्रतिपादन सीमा बोके यांनी केले. तद्नंतर नाशिक, धुळे व जळगाव मधील विविध पदांचे नियुक्तीपत्र मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले. यामध्ये धरणगाव येथील शिवमती ज्योती लक्ष्मण पाटील यांची जिजाऊ ब्रिगेड धरणगाव तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती सीमा बोके, विभागीय अध्यक्ष शिवमती नूतन पाटील, तज्ञ मार्गदर्शक शिवमती ज्योती पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष शिवमती लिना राम पवार, कार्याध्यक्ष सुचिता पाटील, कोषाध्यक्ष वर्षा पाटील - जयश्री पाटील, जिल्हा सचिव कांचन पाटील - रश्मी कदम, जिल्हा संघटक जयश्री पाटील - लिना पाटील - स्मिता शिसोदे - वैशाली पाटील - सोनाली पाटील, शहर प्रमुख जयश्री देवरे - भोसले यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.