एरंडोल नगरपालिके तर्फे या हॉस्पिटल चे नळ कनेक्शन केले बंद.

एरंडोल:-  एरंडोल शहरातील मालमत्ता कर व पाणीपट्टी कराच्या  १००% वसुलीचे उद्दिष्ट पूर्ततेकामी  मुख्या्धिकारी श्री जनार्दन पवार  यांनी आढावा बैठक घेऊन संपूर्ण शहरात थकबाकी वसुली करीता  धडक कारवाई पथकांची नेमणूक केली असून कार्यक्रम निश्चित करून देण्यात आला आहे.

एरंडोल नगरपालिके तर्फे कल्पना हॉस्पिटल चे नळ कनेक्शन केले बंद.

          त्यानुसार आज दि 26 मार्च 2024 रोजी शहरातील नामांकित कल्पना हॉस्पिटल चे 2 नळ कनेक्शन  थकबाकी न भरल्यामुळे बंद करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील  सीताराम भाई  नगर ,मास्टर कॉलोनी,  पद्ममाई पार्क , पद्मालय नगर, ओम नगर येथील  थकीत करदात्यांचे  72 नळ कनेक्शन  आतापावेतो बंद करण्या्त आले असून सदर थकीत कर दात्यांना कराची रक्कम भरण्याकरता वारंवार सूचना देऊन तसेच विनंती करून देखील भरणा न केल्यामुळे नळ कनेक्शन बंद करण्याची कटू कारवाई करण्यात आली.  


         कर वसुलीची  मोहीम अजून कडक  करण्यात येणार असून त्यात  नळ कनेक्शन बंद करणे , स्थावर मालमत्ता जप्त   करणे अशी कारवाई हाती घेण्यात येत आहे. 


तसेच थकित करदात्यांना जप्तीच्या् नोटीसा बजावण्यात येत असून  कराचा भरणा न केल्यास त्यांची  नावे वर्तमानपत्रात प्रसिध्द  करून न.पा.अधिनियमातील तरतुदी नुसार स्थावर मालमत्ता जप्त करून त्यांची   जाहीर लिलावाव्दारे विक्री करण्यात येईल. 


       तरी सर्व करदात्यांनी 31 मार्च च्या आत आपल्या‍ करांचा भरणा  करावा व कटु प्रसंग टाळावा व न.पा.स सहकार्य करावे असे आवाहन एरंडोल  न.पा.चे मुख्याधिकारी श्री जनार्दन पवार  यांनी  केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post